• Total Visitor ( 369984 )
News photo

IRCTC ची वेबसाइट ठप्प, किती तासासाठी बुकिंग बंद?

Raju tapal December 09, 2024 68

IRCTC ची वेबसाइट ठप्प, किती तासासाठी बुकिंग बंद?



IRCTC चा वेबसाइट ठप्प झाली आहे. त्यामुळे तिकीट बुक करता येत नाहीय. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय.



IRCTC ची वेबसाइट ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वे तिकीटांची बुकिंग बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. महत्त्वाच म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्यावेळी ही IRCTC ची वेबसाइट ठप्प झाली आहे. IRCTC ने स्टेटमेंट जारी करुन साइटच्या मेंटेनेंसच काम चालू असल्याच सांगितलं. त्यामुळे पुढचा 1 तास IRCTC वरुन कुठलही बुकिंग करता येणार नाहीय. IRCTC ची सर्विस डाऊन झाल्यामुळे तात्काळ तिकिट बुक करणाऱ्यांना अडचणी येत आहेत.



IRCTC ची सर्विस डाऊन झाल्यामुळे तात्काळ तिकिट बुक करणाऱ्यांना अडचणी येत आहेत. डाउनडिटेक्टरने वेबसाइटच्या आउटेजची पुष्टि केली आहे. IRCTC सर्विस डाउन झाल्यानंतर एक्स वर TATKAL आणि IRCTC दोन कीवर्ड ट्रेंड करत आहेत. सामान्यत: मेंटेनेंसच काम रात्री 11 वाजल्यानंतर चालतं. हा सायबर हल्ला तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.



तिकीट कॅनशलेशन करण्यासाठी लोकांना कस्टमर केअर नंबरवर फोन करायला ईमेल करायला सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला आहे. लोक सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त करतायत. IRCTC ला टॅग करुन लोक अनेक प्रश्न विचारतायत.



 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement