• Total Visitor ( 702571 )
News photo

कल्याण तालुका (टिटवाळा) पोलिस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान

Raju tapal January 08, 2026 79

कल्याण तालुका (टिटवाळा) पोलिस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान

राजू टपाल.

टिटवाळा:- कल्याण तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी पत्रकार दिना निमित्त टिटवाळा परिसरातील पत्रकारांना बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस स्टेशन तर्फे सर्व पत्रकारांना अल्पोपहार ही देण्यात आला.

पोलिस आणि पत्रकार हे समाजाचे प्रतीक असून नाण्याच्या दोन बाजू आहेत. पोलिस काही चुकले तर पत्रकारांनी त्यांचे कान खेचले पाहिजे असे सांगत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिळून मिसळून काम करणे आवश्यक असल्याचे मत पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी व्यक्त केले. तर पत्रकार दिना निमित्त असा पोलिस स्टेशनला बोलावून सन्मान करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने पत्रकारांनी देखील पोलिसांचे आभार मानले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026