• Total Visitor ( 430387 )
News photo

शिक्रापूर येथील "कर्तव्य फाऊंडेशन"ने घडविले माणुसकीचे दर्शन 

Raju tapal January 03, 2026 63

शिक्रापूर येथील "कर्तव्य फाऊंडेशन"ने घडविले माणुसकीचे दर्शन 

          

 ७५०० भीम अनुयायांना कर्तव्य फाऊंडेशनच्या‌ वतीने शिक्रापूर येथे अल्पोहार,चहा व पाणी बॉटलचे वाटप

        

शिक्रापूर:- २०८ व्या शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा नजीकच्या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांमधून आलेल्या लाखो अनुयायांच्या सेवेसाठी शिक्रापूर येथे सालाबाद प्रमाणे कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने सुमारे साडेसात हजार अनुयायांना व्हेज पुलाव,पाणी बॉटल व चहाचे वाटप करण्यात आले. सामाजिक दातृत्वाचा हा उपक्रम जनमाणसांत कौतुकाचा विषय ठरला आहे. विजय स्तंभाकडे जाणाऱ्या भीम अनुयायांचे शिक्रापूर येथे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले नववर्षाच्या पहिल्या दिवशी सामाजिक ऋणाची जाणीव ठेवत फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेशराव गडदे,शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेशराव गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके,सहाय्यक गट विकास अधिकारी लहामटे साहेब विस्तार अधिकारी एस.के.शिंदे बी.आर.गावडे ग्रामपंचायत अधिकारी एस.व्ही शिंदे,डी.एन. पलांडे,जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना श्रीकांत वाव्हळ,नंदकुमार वैद्य,संचालक गंगाधर देशमुख,शांताराम पाडळे,निलेश लोंढे,सुरेश साळवे,राणी कांबळे,रंजना वाघमारे,लता चितळकर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश भुजबळ राहुल राजगुरू इत्यादी सर्व कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते अंकुश घारे,पत्रकार उदयकांत ब्राम्हणे,महेश शिर्के,निलेश जगताप,राजाराम गायकवाड,आदर्श ग्रंथपाल संतोष काळे,मोहम्मद भाई तांबोळी,जितेंद्र काळोखे मेघा तांबे वैशाली गायकवाड वंदना रामगुडे इत्यादी कर्तव्य फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कर्तव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही सातत्याने कार्य करत असतो त्याचाच एक भाग म्हणून लाखो भीम अनुयायांची सेवा करण्याची आणि समाजसेवेच्या कार्याची सुरुवात वर्षाच्या पहिल्या दिवसापासून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे असे  कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे यांनी टिटवाळा न्यूज ला सांगितले. माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे,समाज बांधवांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांची सेवा करण्याची संधी नववर्षाच्या सुरुवातीला मिळणे हे मी भाग्याचे समजतो असे शिक्रापूर गावचे आदर्श सरपंच रमेशराव गडदे यांनी "टिटवाळा न्यूज "ला सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement