• Total Visitor ( 583175 )
News photo

आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपकडून कोंढापुरी येथील खंडोबा मंदीराची स्वच्छता 

Raju Tapal publisher June 13, 2026 42

आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपकडून कोंढापुरी येथील खंडोबा मंदीराची स्वच्छता 

         

शिरूर (प्रतिनिधी:- विजय ढमढेरे):- खेड तालुक्यातील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंग त्रिवेणी आश्रम ग्रुपकडून शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील खंडोबा मंदीराची साफसफाई करण्यात आली. खेड तालुक्यातील मरकळ येथील त्रिवेणी आश्रमातील आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपने शुक्रवार दि.१२ जून २०२६ रोजी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे भेट दिली. योगेंद्र पवार,संस्कृती किसवे,संदेश कवळे,ओम पवार,आदेश खेतमाळीस,प्रथमेश,मानव चावला,समृद्धी,आर्या,ओंकार यांचा समावेश असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपने खंडोबा मंदीर परिसराची स्वच्छता केली. कोंढापुरी येथील ग्रामस्थ शामराव गेणूजी घाडगे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपचे स्वागत करून त्यांना सहकार्य केले. सायंकाळी ७ नंतर विठ्ठल रूक्मिणी मंदीरात पार पडलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगेंद्र पवार,संस्कृती किसवे,संदेश कवळे यांनी सांगितले,आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये श्वासावर नियंत्रण,श्र्वासाचा अभ्यास यावर माहिती मिळते.युवा पिढीला मनाची एकाग्रता,मनाची शांती कशी मिळवता येईल याच्यावर आर्ट ऑफ लिव्हिंग फोकस करते.आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जीवनाचे महत्व सांगण्यात येते.पाणी हे जीवनाचा महत्वाचा घटक आहे.पाण्याचा योग्य उपयोग करायला पाहिजे.श्वासावर नियंत्रण ठेवले पाहिजे.सात्विक,राजसिक, तामसिक हे आहाराचे प्रकार असून सात्विक आहारामुळे मन चांगले राहाते, बुद्धी चांगली राहाते . स्मरणशक्ती चांगली राहाते.तामसिक आहारामुळे आपल्याला राग येतो.तामसिक अन्नामुळे मन चंचल राहाते.आपले शरीर घाम गाळण्यासाठी असते.आपल्या शरीराचा वापर करायचा असतो.आपण काळाला बदलू शकत नाही.आपल्यामध्ये आपण बदल करू शकतो.जे आपण खातो ते आपल्या मनाला शांती देते.श्वासावर नियंत्रण जगावर नियंत्रण असे सांगताना श्वासावर नियंत्रण ठेवले पाहिजे असेही सांगितले. पंचमहाभूते कोणती असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थितांना केला.यावेळी योगासनांचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. कोंढापुरी येथील ग्रामस्थ विलासराव चव्हाण,गुलाबराव भागूती गायकवाड,कोंडीबा नाना गायकवाड,आरोग्य समिती सदस्य , पत्रकार विजय ढमढेरे यांच्यासह महिला,लहान मुले,मुली कार्यक्रमास उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement