• Total Visitor ( 702467 )
News photo

कल्याण एसटी डेपो येथे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी

Raju Tapal publisher May 07, 2026 72

कल्याण एसटी डेपो येथे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी



प्रवास सवलत व पास नोंदणीसाठी रांगा



कल्याण :-  एसटी डेपो येथे आज ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध शासकीय प्रवास सवलत योजना, एसटी पास नोंदणी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. उन्हाच्या तडाख्यातही अनेक ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले. यावेळी काही नागरिकांनी अधिक सुविधा,सावली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. डेपो परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज सुरू असले तरी गर्दीमुळे नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026