• Total Visitor ( 428855 )
News photo

शार्प शुटरकडून बिबट्या ठार

Raju tapal November 05, 2025 116

शार्प शुटरकडून बिबट्या ठार

        

शिक्रापूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात बळी घेणा-या बिबट्याला शार्प शुटरकडून ठार मारण्यात यश आले. गेल्या तीन आठवड्यात नरभक्षक बिबट्याकडून दोन चिमुकले,एका वयोवृद्धाचा‌ बळी घेण्यात आला होता. या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रोष व्यक्त करत आंदोलन केले. पिंपरखेड येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी वनविभागाचे रेस्क्यू‌ संस्थेचे पशु चिकित्सक डाॅ‌.सात्विक पाठक,जुबीन पोस्टवाला,डाॅ‌.प्रसाद दाभोळकर हे शार्प शूटर तैनात करण्यात आले होते. वनविभागाच्या वतीने दिवसभरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप,तसेच बिबट्याच्या ठशांचे निरीक्षण करण्यात आले. थर्मन ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात आला. घटनास्थळापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर रेस्क्यू टीमला बिबट्या दिसून आला. बिबट्या चवताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर नी अचूक नेम धरत बिबट्याला गोळ्या घालून ठार केले. बिबट्या अंदाजे ५ ते ६ वर्षे वयाचा नर बिबट्या असून बिबट्याचे शव रात्री ग्रामस्थांना दाखवून पुढील कार्यवाहीसाठी बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले. पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस,अमृत शिंदे,शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनानुसार रेस्क्यू संस्थेचे सदस्य,स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सदर कार्यवाही पार पडली.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement