• Total Visitor ( 430384 )
News photo

हरविलेला चिमुकला आईच्या स्वाधीन           

Raju tapal October 29, 2025 88

हरविलेला चिमुकला आईच्या स्वाधीन 

         



शिक्रापूर (प्रतिनिधी):- हरविलेल्या तीन वर्षांच्या मुलाला रांजणगाव पोलीसांनी आईच्या स्वाधीन केले.

या घटनेबाबत समजलेल्या माहितीनूसार,२७ आॅक्टोबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास शिरूर येथील रिक्षाचालक सद्दाम अकबरखान हे त्यांच्या सोबत तीन वर्षांचा मुलगा घेवून रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात आले. हा मुलगा मला कारेगाव‌ हद्दीत पाटील वाडा येथे मिळाल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले. याच्या आई वडिलांचा शोध घ्या असेही त्यांनी पोलीसांना सांगितले. त्यांच्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी वैजनाथ नागरगोजे,आकाश सवाने‌,संदीप भांड,योगेश गुंड,महिला अंमलदार शितल रौंधळ,पुजा नाणेकर यांनी  दोन पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली. पोलीसांनी मुलांचा व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांना मदतीचे आवाहन केले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दिव्यभारती राम खिलारी‌  रा.कारेगाव या पोलीस स्टेशनमध्ये आल्या. हा माझा मुलगा मटरू‌ राम खिलारी‌ आहे. मी कामानिमित्त घराबाहेर गेले असता तो हरवला. सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही असे भावनिक स्वरात सांगितले. सदर महिलेची ओळख पटवून पोलीसांनी चिमुकल्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement