• Total Visitor ( 428973 )
News photo

महेंद्र उर्फ अण्णा पंडित "भीमयोद्धा" पुरस्काराने सन्मानित

Raju tapal May 21, 2025 79

महेंद्र उर्फ अण्णा पंडित "भीमयोद्धा" पुरस्काराने सन्मानित...



उल्हासनगर-स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव नुकताच साजरा करण्यात आला जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा भीम रत्न व भीम योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सदर कार्यक्रमात गौरविण्यात आले. महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी सामाजिक अत्याचाराच्या विरोधात निर्भिडपणे आवाज उठवुन शोषीत पिडीतांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल या अभ्यासु समाजसेवकाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भीमयोद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला. महेंद्र उर्फ अण्णा पंडीत. हे श्रमिक मु पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष असुन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत.पिडीत, शोषितांच्या मदतीला रात्री बेरात्री धावुन जाणारा, त्यांना कायदेशीर मार्गदर्शन व मदत करणारा एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असुन त्यांच्या कार्याची महती पंचक्रोशीत लपुन राहीलेली नाही. अण्णा पंडीत यांच्या सामाजिक कार्याची दखल स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जय गायकवाड यांनी घेतली असून ज्येष्ठ विचारवंत, संपादक,पत्रकार आणि ८४ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.उत्तम कांबळे आणि पत्रकार व्याख्याते किरण सोनावणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व स्मृतिपदक देवुन भीम योद्धा पुरस्काराने अण्णा पंडीत यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी विचारमंचावर धम्म अभ्यासिका शीलाताई जाधव, लताबाई पडघान, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.गोपाळ भगत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जय गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



अण्णा पंडीत यांना भीमयोद्धा पुरस्कार प्राप्त झाल्याने समाजातील प्रत्येक स्तरातुन त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement