• Total Visitor ( 84384 )

मातोश्री लॉन्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक बैठक संपन्न

Raju Tapal February 15, 2022 33

नांदगाव येथील मातोश्री लॉन्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक आढावा बैठक पंकज भुजबळ व नाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जवळच येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध सहकारी सोसायटी यांच्या निवडणुकीसंदर्भात दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी शनिवारी नांदगाव येथील मातोश्री मातोश्री लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक आढावा बैठक नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
     यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यात आला त्याप्रसंगी माजी आमदार संजय भाऊ पवार, पुरुषोत्तम कडलक, नांदगाव तालुका अध्यक्ष विजू भाऊ पाटील, नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद भाऊ शेलार, सेवादलाचे राजेंद्र जाधव, सोपान पवार, गौतम जगताप, दत्तू पवार, बाळ काका कलंत्री, वाल्मीक टिळेकर, राजाभाऊ लाठे, प्रताप दादा पवार, काका सोळसे, रामू दादा पवार, डॉक्टर वाय पि. जाधव, शिवा भाऊ सोनवणे, सुगंधा खैरनार, हबीब भाई शेख, सुरेश गायकवाड,, अशोक पाटील, महेश पवार, बाळासाहेब देहाडराय, दया जुन्नरे, सचिन देवकाते, विश्वास आहिरे, सचिन कोरडे, मुकुंद खैरनार, मनोज कोरडे, डॉक्टर जाधव, सचिन सोमासे, कारभारी पाटील, बोडके रामचंद्र पवार, शेषराव आण्णा पवार, उदय आप्पा, कैलास गायकवाड व इतर राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Share This

titwala-news

Advertisement