• Total Visitor ( 430423 )
News photo

शिक्रापूर येथील जेष्ठ नागरिक संघाची मासिक मिटींग संपन्न          

Raju tapal November 22, 2025 54

शिक्रापूर येथील जेष्ठ नागरिक संघाची मासिक मिटींग संपन्न

         

शिरूर:- शिक्रापूर येथील जेष्ठ नागरिक संघाची मासिक मिटींग १९/११/२०२५ रोजी भैरवनाथ मंदीर याठिकाणी पार पडली. माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी‌ कुरियन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमास शिक्रापूर गावचे सरपंच रमेशराव गडदे‌, पोलीस स्टेशनचे गिरमकर साहेब,करपे साहेब,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डाॅ‌.दिनकर कळमकर,बाळासाहेब शेंडे,अर्जून शिर्के,सेवानिवृत्त प्रा.साकोरे सर,निवृत्ती जकाते‌,वसंत तांबे,भंडारी,अशोक कुदळे,शिवाजी मचे  यांच्या सह पदाधिकारी सभेस उपस्थित होते. तुम्ही चांगले काम करत आहात असे गौरवोद्गार माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी‌ कुरियन यांनी सभेत काढले. जागेचा प्रश्न सोडवू असे आश्वासन सरपंच रमेशराव गडदे‌ यांनी सभेत दिले. फसवणूक होण्याची शक्यता असल्याने मोबाईलचा वापर जपून करावा असे आवाहन गिरमकर साहेब यांनी मासिक मिटींगमध्ये केले. जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या सभेस १०० ते १२० जेष्ठ नागरिक उपस्थित होते. मचे‌ सर यांनी सुत्रसंचलन केले. मुसळे सर यांनी आभार मानले. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement