• Total Visitor ( 481744 )
News photo

मोटरसायकल चोरट्यास शिरूर पोलीसांकडून अटक       

Raju tapal June 23, 2025 87

मोटरसायकल चोरट्यास शिरूर पोलीसांकडून अटक       



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर शहरातील मार्केट यार्ड परिसरातून चोरीस गेलेली मोटरसायकल शिरूर पोलीसांनी हस्तगत करून मोटरसायकल चोरट्यास अटक केली.

बापू गजानन थोरात वय - ३५ रा‌.बोळेगाव जि.अहिल्यानगर असे शिरूर पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

२८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान होंडा शाईन मोटरसायकल मार्केट यार्ड परिसरातील मोकळ्या जागेत हॅण्डल लाॅक करून पार्क केल्याबाबत फिर्यादी ने फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून बापू गजानन थोरात या आरोपीला नागपूर एम आय डी सी परिसरातून अटक केली.

त्यांच्याकडून हिरो होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH 13 BG 6927 जप्त केली.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement