• Total Visitor ( 471073 )
News photo

शहापूर ग्रामीण भागामधून कु.शिवानी तेलवणे यांना दंत चिकित्सक पदवी प्राप्त

Raju Tapal publisher April 07, 2026 30

शहापूर ग्रामीण भागामधून कु.शिवानी तेलवणे यांना दंत चिकित्सक पदवी प्राप्त



डॉ.शिवानी यांचे ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याचे ध्येय...



राजू टपाल.

शहापूर : - शहापूर येथील रहिवासी आणि वैश्य समाजातील शिवानी तेलवणे  यांनी दंत चिकित्सेच्या क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले असून,त्यांना प्रतिष्ठित दंत महाविद्यालयातून दंत रोग तज्ञाची पदवी मिळाली आहे. या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह शहापूर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ.शिवानी रमेश तेलवणे यांनी आपल्या शिक्षणादरम्यान दातांच्या विविध आजार, दंत शस्त्रक्रिया आणि आधुनिक दंत उपचार पद्धतींमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. त्यांचा हेतू शहापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आणि परवडणारे दंत उपचार उपलब्ध करून देण्याचा आहे. शहापूरचे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून डॉ.शिवानी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे स्थानिक स्तरावर दंत आरोग्य सेवांना चालना मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement