• Total Visitor ( 435882 )
News photo

मुंबई विद्यापीठाचा ५८ वा युवक महोत्सव जीवनदीप महाविद्यालयात संपन्न 

Raju tapal August 05, 2025 145

मुंबई विद्यापीठाचा ५८ वा युवक महोत्सव जीवनदीप महाविद्यालयात संपन्न 



गोवेली :- विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांचा विकास व्हावा,त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून यावा; याकरिता विद्यार्थी विकास विभाग मुंबई विद्यापीठ व जीवनदीप महाविद्यालय गोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे पालघर ग्रामीण झोन क्रमांक सहाचा ५८ वा युवक महोत्सव जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः गणरायाच्या पूजनाने,दीप प्रज्वलन राष्ट्रगीत,राज्यगीत व विद्यापीठ गीताने करण्यात आली. दिनांक ०४- ०८- २०२५ रोजी च्या या युवक महोत्सवात प्रमुख मान्यवर कलाकार संदीप रेडकर, निलेश सावे, कलाकार शितल रेडकर, ठाणे पालघर झोनचे समन्वयक डॉ.जयश्री कवठेकर, डॉ.प्रकाश धुमाळ, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाघ यांनी केले, प्रमुख मान्यवर संदीप रेडकर व निलेश सावे यांनी विद्यार्थ्यांना युवक महोत्सवाबाबत मार्गदर्शन केले. या नंतर सर्व स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमांमध्ये रांगोळी, वकृत्व, एकपात्री, पथनाट्य, मेहंदी, पारंपारिक नृत्य, संगीत, वादविवाद स्पर्धा, ऑन स्पॉट पेंटिंग, क्ले आर्ट इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी १८ हून अधिक महाविद्यालयाने यावेळी सहभाग नोंदवला सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थी व महाविद्यालयाचे समन्वय प्राध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करता वेळी जीवनदीपच्या उत्तम आदरातिथ्य बाबत आभार व्यक्त केले. युवक महोत्सवात सहभागी व विजयी महाविद्यालयांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता वेळी तुम्ही युवक आहात तरुण आहात या तारुण्याचा उपयोग देशाच्या, समाजाच्या व स्वतःच्या उन्नतीसाठी करा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सतीश लकडे यांनी केले. महोत्सवासाठी महाविद्यालयाचे संचालक प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य. हरेंद्र सोष्टे, तसेच, सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा.मोहन गारे, प्रा.मयुरी कांबळे, प्रा.ललिता पवार, महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, यांच्या सर्वांच्या सहकार्याने सदर युवक महोत्सव यशस्वी रित्या संपन्न झाला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement