• Total Visitor ( 486590 )
News photo

टिटवाळ्यात नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

Raju Tapal publisher April 18, 2026 62

टिटवाळ्यात नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन



राजू टपाल.



टिटवाळा :- जनप्रबोधिनी मांडा टिटवाळा,पंडित वासुदेव शास्त्री पणशीकर सार्वजनिक वाचनालय आयोजित नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. महर्षी नारदांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व हरिभक्तांच्या सहकार्याने 29 वा नारदीय कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. सदर महोत्सवात सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी ह.भ.प. भक्तीताई समुद्र,(डोंबिवली),मंगळवार 21 एप्रिल रोजी ह.भ.प. चंद्रशेकर शुक्ल (डोंबिवली),22 व 23 एप्रिल रोजी ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर (पुणे),शुक्रवार 24 एप्रिल रोजी ह.भ.प. चिन्मयबुवा देशपांडे(पुणे) तर शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी ह.भ.प. गणेशबुवा गाडगीळ(कल्याण ) यांचे कीर्तन होणार असून रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता लळीताचे कीर्तन ह.भ.प. गणेशबुवा गाडगीळ हे करणार असून त्यांना साथसंगत तबला कु. चित्तरंजन कान्हेरे तर संवादिनी जेताश्री गडकरी या असणार आहे. सदरील कार्यक्रम हा दररोज रात्री 9 ते 11पर्यन्त मारुती मंदिर टिटवाळा स्टेशनजवळ मांडा टिटवाळा पूर्व येथे होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष सुभाष जोशी कार्यवाह विवेक पुराणिक कोषाध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी केलेली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement