अमरावतीत राष्ट्रीय पंचायत राज दिन उत्साहात साजरा
अमरावती-भारत सरकार यांचे पंचायती राज मंत्रालयाकडील सुचनांनुसार 24 एप्रिल 2025 रोजी राज्यातील सर्व त्रिस्तरीय पंचायतराज संस्थामध्ये "राष्ट्रीय पंचायत राज दिवस-NPRD"२०२५ National Panchayat Raj Day NPRD साजरा करण्याबाबत तसेच सर्व ग्रामपंचायती मध्ये विशेष ग्रामसभा आयोजनाच्या सुचना प्राप्त असुन अमरावती जिल्हा परिषद, अंतर्गत 14 पंचायत समिती व 841 ग्रामपंचायती मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून "राष्ट्रीय पंचायत राज दिवस-NPRD" २०२५ कार्यक्रम साजरा करण्यात आला.
जिल्हास्तरिय कार्यक्रमाचे आयोजन डॉ पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी मा संजीता महापाञ मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब बायस जिल्हास्तरिय नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा/पं) यांनी केले.उक्त प्रसंगी शासनाच्या सुचनेनुसार महिलास्नेही, स्वच्छ व हरित गाव संकल्पना, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच धर्मेंद्र मेहरे ग्राप उत्तमसरा प.स. भातकुली, योगिता रिठे ग्रां. प. प्रिंप्री निपाणी पंस नांदगाव खंडे, मनिषाताई वरघट ग्रापं देवरा पंस भातकुली यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमामध्ये देशाचे सन्मानिय पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे मधुबनी बिहार येथुन पंचायतराज दिवसाबाबत सुरु असलेले थेट प्रक्षेपण करण्यात आले कार्यक्रमा करिता जि.प.अमरावती येथील सर्व खाते प्रमुख, सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कक्ष जि.प.अमरावती यांनी केले.