डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नवनाथ बण यांचा सांगलीत सत्कार:मान्यवरांची उपस्थिती!
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर निवड झाल्याबद्दल भाजपाचे मुख्य प्रवक्ते व पत्रकार नवनाथ बण यांचा सांगली येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नवनाथ बण यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ABP माझा च्या संपादिका सरीता कौशिक,सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनीष केत,अशोक देढे तसेच संजय फुलसुंदर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार सोहळा पार पडला.