निओसिम इंडस्ट्रीज लिमिटेड, कामगार युनियन मध्ये बोनस बाबत चर्चा यशस्वी
शिक्रापूर (प्रतिनिधी):- निओसिम इंडस्ट्रीज लिमिटेड सणसवाडी आणि निओसिम इंडस्ट्रीज लिमिटेड तळेगाव ढमढेरे मशीन शॉप आणि शिवशाही कामगार युनियन मध्ये दिवाळी बोनस बाबत चर्चा यशस्वी झाली. दौंड तालुक्याचे राहुल दादा कुल प्रणित शिवशाही महाराष्ट्र राज्य कामगार युनियन चे संस्थापक सुधीरकाका ढमढेरे,युनियनचे संस्थापक- जनरल सेक्रेटरी राजेंद्र तकटे व सर्व कामगार प्रतिनिधी आणि कंपनी प्रशासनाच्या वतीने तेज राजपूत,व्हॉइस प्रेसिडेंट नरेंद्रजी झुनझूनवाला व्हॉइस प्रेसिडेंट स्वप्निल जठार यांच्यामध्ये सन २०२४ ते २०२५ या वर्षीच्या दिवाळी बोनसबाबत चर्चा झाली कंपनीशी भरपूर संघर्ष करून कंपनीची परंपरा मोडीत काढून शिवशाही महाराष्ट्र राज्य कामगार युनियन यांनी सन २०२४ ते २०२५ यावर्षीचा दिवाळी बोनस २८५००/- रुपये जाहीर केला.
यामुळे सर्व शिवशाही कामगार युनियनच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवशाही कामगार युनियनचे संस्थापक सुधीर काका ढमढेरे यांनी ही माहिती कळविली.