• Total Visitor ( 369603 )
News photo

कल्याण येथे शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

Raju tapal February 18, 2025 71

कल्याण येथे शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन



कल्याण ( प ) :- महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात कल्याण पश्चिम शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन,टावरीपाडा येथे संपन्न होत आहे, आयोजनाचे हे ८ वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवरायांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवावे ,विचार कला, कौशल्य संपूर्ण इतिहास येणाऱ्या पिढीला माहिती व्हावा,

जनतेने एकत्र यावे हा मुख्य उद्देश सार्थ ठरवित या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन असून केले असून सकाळी दूर्गाडी किल्यावरून शिवज्योत आगमन, आरोग्य शिबीर, रक्त चिकित्सा शिबीर,चित्रकला स्पर्धा, ढोल ताशा लेझिम साथीने भव्य मिरवणूक, हळदी कुंकू समारंभ, छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान,भंडार असे कार्यक्रमाचे आयोजन असल्याची महिती शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन कमिटीचे सेक्रेटरी बजरंग तांगडकर यांनी दिली.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement