• Total Visitor ( 430071 )
News photo

श्री क्षेत्र घोटसई ते श्री क्षेत्र मढी पालखी सोहळा संपन्न

Raju tapal January 04, 2026 27

श्री क्षेत्र घोटसई ते श्री क्षेत्र मढी पालखी सोहळा संपन्न



श्री क्षेत्र घोटसई ते श्री क्षेत्र मढी पालखी सोहळा 3 जानेवारी रोजी कानिफनाथ भक्त हभप माणिक मगर तसेच कानिफनाथ पुजारी हभप काळुराम मगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

सकाळी सात वाजता घोटसई येथील कानिफनाथ मंदिरात पालखीचे पूजन करण्यात आले. असंख्य भाविकांनी दर्शन घेऊन पालखी सोहळयाला सुरूवात झाली. पालखी सोहळ्यात आमदार किसन कथोरे,युवा नेते दिनेश कथोरे,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविंद्र घोडविंदे, संचालक योगेश धुमाळ,माजी नगरसेवक संतोष तरे, माजी सरपंच काशिनाथ मगर,राजु मगर,सुयोग मगर,संजय शेलार,जिल्हा परिषद माजी सदस्या जयश्री सासे यांच्या सह आदि उपस्थित होते. तसेच पालखी सोहळ्यात खास करून लहान मुलांनी कानिफनाथाची वेशभूषा केली होती.

यावेळी हभप कानिफनाथ भक्त माणिक मगर यांनी सांगितले की मढी,सागाव,घोटसई हे तीन स्थान कानिफनाथ यांचे आहेत. पालखी सोहळ्याचे हे आठवे वर्ष आहे. घोटसई परिसरातील असंख्य भाविक प्रत्येक वर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होतात.  प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या वाढत चालली आहे. सकाळी पालखी सोहळा असतो. नंतर आम्ही कानिफनाथ यांचे स्थान असलेले मढी येथे जातो. तेथे भजन,किर्तन आदि कार्यक्रम रात्रीचे असतात. यावर्षीही दहा बस मधून भाविक पालखी सोहळ्यास निघाले आहेत असे सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement