• Total Visitor ( 435331 )
News photo

गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा 

Raju tapal July 02, 2025 120

गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा 



प्रशालेतील विद्यार्थिनींकडून व्यसनमुक्ती, वृक्षारोपण,परिसर स्वच्छतेचा संदेश



शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक २८ जून २०२५  रोजी शालेय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकरी  वेशभूषेत, टाळ मृदंग, तुळशी वृंदावन, विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा व मूर्ती घेऊन प्रशालेत उत्साहात आले होते. काही विद्यार्थ्यांनी संत महात्म्यांचे पेहराव घालून दिंडी सोहळ्याला वेगळाच उत्साह प्राप्त करून दिला. 

 प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे ,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या पेहरावात आलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थी संग्राम उकले याच्या मार्फत प्रशालेत अश्व रिंगण संपन्न झाल्यानंतर प्रशालेच्या दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

तळेगावातील विविध पेठांमधून दिंडीचे प्रस्थान होत बाजार मैदान येथे प्रशालेतील दिंडी सोहळ्याने विसावा घेतला. या ठिकाणी ग्राम स्वच्छतेवर आधारित पथनाट्याचे  सादरीकरण  करण्यात आले त्याचप्रमाणे प्रशालेच्या विद्यार्थिनींनी वारकरी नृत्यही तेथे सादर केले या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थिनींनी ग्रामस्थांना व्यसनमुक्ती, वृक्षारोपणाचे महत्त्व व परिसर स्वच्छता किती महत्त्वाची आहे याचा संदेश दिला.

बाजार मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंदादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे, श्रीपती भुजबळ, पत्रकार मयूर भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र सातपुते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सादर  केलेल्या पथनाट्याचे कौतुक सर्व ग्रामस्थांनी केले. यानंतर प्रशालेच्या दिंडीने शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे यांच्या निवासस्थानी विसावा घेतला. तिथे पालखीचे पूजन करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सुनंदा ढमढेरे व मालन ढमढेरे यांनी उत्कृष्ट अभंगाचे गायन करून विद्यार्थ्यांना अभंग गायनाची प्रेरणा दिली.त्यानंतर प्रशालेच्या दिंडीचे प्रस्थान ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे या ठिकाणी झाले तिथे सामाजिक कार्यकर्ते  नवनाथ भुजबळ व तळेगावचे माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांच्या हस्ते प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले.

या  दिंडी सोहळ्यात प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी  उत्साहाने सहभाग घेतला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement