हा तर चमत्कारच!
देव तारी त्याला कोण मारी
अहमदाबाद विमान दुर्घटनेतून एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला
तर ही ज्या वेळी दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा विमानात प्रवास करणारा रमेश विश्वास कुमार नावाचा तरुण हा एकटाच जिवंत सापडला
अहमदाबाद :- देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्येय अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातून आला आहे. एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवाशी प्रवास करत होते. ८ टँकर भरतील इतकं इंधन घेऊन उड्डाण केलं आणि विमान क्रॅश झालं. भयानक झालेल्या स्फोटामध्ये 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या भयानक दुर्घटनेमध्ये एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. भीषण दुर्घटनेत कुणीही वाचण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात आले. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार विमान अपघातातून एक प्रवासी सुखरूप असल्याचे पुढे आले आहे.या दुर्घटनेबाबत अहमदाबाद पोलीस आयुक्त जी.एस मलिक यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार,एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एक प्रवासी जिवंत आढळला आहे. हा प्रवासी A11 या सीट नंबरवर होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्याबाबत अद्याप सांगू शकत नाही. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे कारण विमान नागरी वस्तीत कोसळले आहे असं त्यांनी म्हटलं.
अहमदाबाद विमानतळारून टेकऑफ केल्यानंतर अवघ्या १६ किमी अंतरावर एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळलं. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या कँटीनवर कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की, अवघ्या ३५ सेकंदामध्ये भीषण असा स्फोट झाला. या स्फोटात विमानातील आणि कँटिनमधील भावी डॉक्टरांचा मृत्यू झाला. विमानातील २४१ आणि कँटिनमधील २० ते २५ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा विमानात प्रवास करणारा रमेश विश्वास कुमार नावाचा तरुण सुखरूप बचावला.
रमेश विश्वास कुमार असं या प्रवाशाचं नाव असून तो 40 वर्षांचा आहे. विश्वास कुमार रमेश हे ब्रिटीश नागरिक असून मागच्या काही दिवसांपासून ते कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश (वय 45) यांच्यासोबत भारतात आले होते. भेटीगाठी झाल्यानंतर लंडनला चालले होते. एअर इंडियाच्या या विमानात सीट नंबर 11 A वर ते बसले होते. पण 'टेक ऑफच्या 30 सेकंदांनंतर विमानातून मोठा आवाज आला आणि विमान कोसळलं. काही कळायच्या आतमध्येच सगळं घडलं', अशी प्रतिक्रिया विश्वास यांनी दिली. विमान अपघातामध्ये विश्वास यांची छाती, डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे.
विश्वास या दुर्घटनेतून बचावले याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण, त्यांच्या बचावण्याचं कारणही चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यांचं सीट हे 11 A होतं. 11 A सीट हे विमानात इकोनॉमी क्लासचं होतं. त्याची बसण्याची जागा ही एक्झिट दाराजवळ होती. असं गृहीत धरलं जातंय की, विमान जेव्हा कोसळलं तेव्हा त्यांनी कमी उंचीवर एक्झिट दार उघडलं असेल आणि बाहेर उडी मारली असेल. पण हे त्यांनी अवघ्या ३० सेकंदात करून स्वत: चा जीव वाचवला, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच पडला होता. मी बराच घाबरलो आणि तिथून पळायला लागलो. माझ्या बाजूला विमानाचे तुकडे पडले होते. मला कुणीतरी पकडलं आणि ऍम्ब्युलन्समध्ये टाकून रुग्णालयात आणलं', असं विश्वास यांनी सांगितलं. मागच्या 20 वर्षांपासून विश्वास लंडनमध्ये राहत आहेत, विश्वास यांची पत्नी आणि मुलगाही लंडनमध्येच आहेत.ते ४० वर्षाचे मूळ भारतीय असलेले ब्रिटनचे नागरिक आहेत. या दुर्घटनेतून विश्वास रमेश वाचल्याने हा चमत्कारच मानला जात आहे. रमेश विश्वासकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातातून बचावलेल्या रमेश यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संवाद साधला. ज्यात एक जोरदार स्फोट झाला. चहुबाजूने आग लागली होती. त्यानंतर मला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला आणले. मी जिवंत आहे यावर मला विश्वास बसत नाही. हे चमत्कारापेक्षा कमी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, रमेश विश्वासकुमार हे गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश दीव येथील येथे आले होते. ते एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जात होते. परंतु जेव्हा हे विमान क्रॅश झाले तेव्हा आपत्कालीन दरवाजातून त्यांनी उडी घेतली असल्याचे बोलले जाते. एअर इंडियाच्या या दुर्घटनेत जवळपास २०० हून अधिक प्रवासी मृत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ कोटींची मदत करण्याचं जाहीर केले आहे.