• Total Visitor ( 429280 )
News photo

कबुतरांना दाणे टाकले; मुंबईत पहिला गुन्हा दाखल...!

Raju tapal August 02, 2025 78

कबुतरांना दाणे टाकले....!



मुंबईत पहिला गुन्हा दाखल



सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे किंवा खाद्य देणे महागात पडू शकते, कारण मुंबई उच्च न्यायालयाने यावर थेट बंदी घातली आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानत, न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हा नोंदवला जावा.

सार्वजनिक आरोग्य धोक्यात

न्यायालयाने म्हटले की, कबुतरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असलेल्या भागांमध्ये सांसर्गिक रोगांचा धोका वाढतो, ज्याचा परिणाम सर्व वयोगटातील नागरिकांवर होऊ शकतो. त्यामुळे दादर कबुतरखाना, मुंबईतील इतर सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न देणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दादर कबुतरखान्यात अन्न टाकले जात असल्याचे समोर आले. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेला गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.

एल.जे.रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा आरोप करत माहिम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement