टिटवाळा इंदिरा नगर येथे तीस हजार झाडे लावण्याचा शुभारंभ
राजू टपाल.
टिटवाळा:- कल्याण डोंबिवली महापालिका तसेच भारत पेट्रोलियम व सावली संस्था यांच्या सहकार्याने टिटवाळा येथील इंदिरा नगर परिसरातील स्मशान भूमी जवळील महापालिकेच्या जागेत तब्बल तीस हजार झाडे लावण्याचा संकल्प केला असून मियावाकी जंगल उभारणीचा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी,उपायुक्त संजय जाधव,रामदास कोकरे,प्रभाग अधिकारी जाlयराम चौधरी,माजी नगरसेवक संतोष तरेतसेच भारत पेट्रोलियमचे गोपाल कृष्णन,अतुल व्यवहारे,सावली संस्थेचे एनजीओ माने,टिटवाळा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी,तसेच विद्यामंदिर शाळा,गुलाबराव शेरे,जी.आर.पाटील शाळेचे मिळून तब्बल साडे चारशे विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी रॅली काढली. झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत पर्यावरण संवर्धनासाठी हातात फलक घेऊन जनजागृती करीत होते. आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यानी एक झाडे लावले पाहिजे अशी शपथ घ्या तसेच कोणत्यातरी एका शाळेने सदरील घनवन दत्तक घ्यावे असे आवाहन केले.