• Total Visitor ( 435261 )
News photo

जयस्तंभ अभिवादन २०२६ अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठकीचे आयोजन 

Raju tapal November 20, 2025 47

जयस्तंभ अभिवादन २०२६ अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठकीचे आयोजन 

शिरूर:-

जयस्तंभ अभिवादन २०२६ पूर्वतयारीच्या‌ अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतील पुणे अहिल्यानगर रोडवरील  पेरणे फाटा ता‌.हवेली येथील जयस्तंभ  येथे जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून १० ते १५ लाख अनुयायी येण्याची शक्यता आहे.पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजना संदर्भात माहिती देण्यासाठी तसेच सर्व संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते तसेच अनुयायी यांच्याकडून सुचना जाणून घेण्यासाठी मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,सोमय मुंडे  पोलीस उपायुक्त परिमंडळ,हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा,प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग  यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.२१/११/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा पोलिस स्टेशन शास्त्रीनगर चौक,येरवडा,पुणे येथे बैठक आयोजित केली आहे.सर्व संघटना प्रमुख,कार्यकर्ते,पत्रकारांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी केले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement