• Total Visitor ( 701177 )
News photo

 सिंधुदुर्गात पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सुतार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

Raju tapal April 12, 2025 93

 सिंधुदुर्गात पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सुतार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  



 सिंधुदुर्ग :- पोलीस हेड कॉन्स्टेबलचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात घडली आहे. दीपक गुंडू सुतार (वय-५२) असे मृत्यू झालेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 



मूळ पाटये पुनर्वसन येथील व सध्या झरेबांबर स्थित दोडामार्ग पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. काल गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अधिक माहितीनुसार, दीपक सुतार हे सकाळी पोलिस ठाण्यात कामावर आले असता अचानक त्यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यामुळे ते स्वतःच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा आजिलो येथे पाठविले. तोपर्यंत सुतार यांचे नातेवाईकही दोडामार्ग येथे आले होते. दरम्यान सुतार यांना पुढील उपचारासाठी आजिलो येथे नेत असताना पुन्हा हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. सुतार हे १९९३ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली होती. 



तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित मूळ पाट्ये गावचे सध्या झरेबांबर तिठा येथे घरी राहत होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक सुतार हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दीपक सुतार यांच्या निधनाची बातमी समजताच जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी दोडामार्ग येथे दाखल झाले होते. दोडामार्ग पोलीस कर्मचारी समीर सुतार यांचे ते नातेवाईक होते. त्यांच्या निधनाने दोडामार्ग परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलिस सलामी देऊन पुनर्वसन स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026