• Total Visitor ( 481800 )
News photo

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत संपवले आयुष्य 

Raju tapal July 08, 2025 66

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत संपवले आयुष्य 



पुणे :- पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. स्वरुप जाधव (वय-२८) असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. स्वरुप जाधव हे मुळचे कोल्हापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.



पुण्यातील स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये स्वरुप जाधव हे राहत होते. आज सोमवारी दुपारी राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याबाबतचा तपास करत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्वरुप जाधव हे पोलीस शिपाई म्हणून पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे राहणारे आहेत. सध्या ते स्वारगेट येथील पोलीस लाईन मध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी त्यांनी राहत्या घरातील हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.



घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट पोलिसांना मिळून आलेली नाही. स्वरुप जाधव यांचा मोबाईल पोलिसांना मिळाला आहे. त्याला लॉक असल्यामुळे सध्या तरी कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, पोलिस या घटनेबाबत अधिकचा तपास करत आहेत. स्वरूप यांनी २०२३ मध्ये पुणे पोलीस दलात सेवा सुरू केली होती. दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्यानेच जीवन संपवल्यानं पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement