• Total Visitor ( 391591 )
News photo

उंभरणीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात

Raju tapal February 09, 2026 219

उंभरणीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात 

नवनिर्वाचित नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड यांच्या कामाचा झपाटा 

राजू टपाल.

टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाक क्रमांक 4 च्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड यांनी आपल्या प्रभाक क्रमांक 4 मधील बल्याणी ते उंभरणी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्याचा कामाला झपाट्याने सुरवात केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून मोहिली,उंभरणी,बल्याणी परिसरातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली होती. सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. सदरची बाब नवनिर्वाचित नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड यांनी प्राधान्य देऊन येथील प्राथमिक गरज रस्त्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच या नंतरही बल्याणी,मोहिली या परिसरातील रस्त्याची कामे करणार असल्याचे सांगितले. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement