प्रेस क्लब कल्याण – रौप्य महोत्सवी वर्ष विशेष वार्तालाप
कल्याण-डोंबिवली परिसरातील पत्रकारांसाठी कार्यरत प्रेस क्लब कल्याण हा धर्मदाय आयुक्त ठाणे कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेला पत्रकार संघ असून, आम्ही गत चोवीस वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहोत. यंदा आमच्या संघाचे पंचविसावे वर्ष असून त्यानिमित्ताने आम्ही रौप्य महोत्सव साजरा करीत आहोत.
याच औचित्याने, आपल्या शहरातील परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त मा. अतुलजी झेंडे यांच्या कार्यकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी, गुन्हेगारी प्रतिबंधासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घेण्यासाठी तसेच समाजप्रबोधनपर त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे –
शनिवार, २३ ऑगस्ट २०२५
सकाळी ११:०० वाजता
आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स सभागृह, कल्याण (प.)
कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली आहे.
आपली सन्माननीय उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
धन्यवाद...
अध्यक्ष – आनंद मोरे
सचिव – विष्णूकुमार चौधरी