• Total Visitor ( 464050 )
News photo

पै.दिग्विजय संदिप भोंडवे दुसऱ्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

Raju Tapal publisher April 03, 2026 39

पै.दिग्विजय संदिप भोंडवे दुसऱ्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी



महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात दिग्विजयवर अभिनंदनाचा वर्षाव



शिक्रापूर:- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सहकार्याने दि.३१ मार्च व १ एप्रिल २०२६ रोजी वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे वरिष्ठ ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद तथा २ री ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या खुल्या वजन गटामध्ये पुणे जिल्ह्याचा पैलवान पै.दिग्विजय संदीप भोंडवे यांने बुलढाण्याच्या पै.अक्षय शेळकेवर  मात करत मानाचा ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी किताब मिळवला. या किताबा सोबत तो चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.प्रा.अशोकजी उईके,महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण,सहकार,खनिकर्म तथा गृहनिर्माण(ग्रामीण) राज्यमंत्री वर्धा जिल्हा पालकमंत्री पंकजजी भोयर व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मा.खासदार रामदासभाऊ तडस यांच्या हस्ते ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी पै.दिग्विजय संदिप भोंडवे यांस चांदीची गदा प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा मा.खासदार रामदासभाऊ तडस यांनी केले होते.

पै.दिग्विजय संदिप भोंडवे दुसऱ्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी किताब पटकविल्याबद्दल त्याच्यावर महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्ह्यात अभिनंदनास्पद कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे -

५५ किलो वजन गट:- प्रथम - पै.अजय निंबाळकर - सोलापुर जिल्हा,व्दितीय - पै.दीनेश काकडे - मुंबई उपनगर,तृतीय - पै.संकेत पाटील - कोल्हापुर,तृतीय - पै.यशराज मोरे - सोलापुर शहर. ६० किलो वजन गट:- प्रथम - पै.विश्वजित मोरे - कोल्हापुर जिल्हा,व्दितीय - पै.जयदीप बडरे - मुंबई शहर,तृतीय - पै.लकी खरात - मुंबई उपनगर. तृतीय - पै.प्रतिक काळेल - पुणे जिल्हा. ६३ किलो वजन गट:- प्रथम - पै.पार्थ कंधारे - पुणे शहर,व्दितीय - पै.अथर्व वाघमोडे - मुंबई उपनगर, तृतीय - पै.ज्ञानेश्वर देसाई - कोल्हापुर,तृतीय - पै धनराज जाधव - सातारा. ६७ किलो वजन गट:- प्रथम - पै.माऊली टीपगुडे - कोल्हापुर जिल्हा,व्दितीय - पै.साई उमाप - पुणे जिल्हा,तृतीय - पै.अजिंक्य माचुत्रे - पिं.चिंचवड,तृतीय - पै.तुषार चटदुखे - चंद्रपुर. ७२ किलो वजन गट:- प्रथम - पै.ओंकार पाटील - कोल्हापुर,व्दितीय - पै.सुरज गबाले - नाशिक,तृतीय - पै.सुरज सावंत - पुणे शहर,तृतीय - पै.सुरज जाधव - ठाणे जिल्हा. ७७ किलो वजन गट:- प्रथम - पै.स्वरुप चौगुले - कोल्हापुर जिल्हा,व्दितीय - पै.ओमकार झाडे - नाशिक,तृतीय - पै.गणेश खाडे - ठाणे शहर,तृतीय - पै.अंकीत यादव - अमरावती. ८२ किलो वजन गट:- प्रथम - पै.अनिकेत जाधव - मुंबई शहर,व्दितीय - पै.अथर्व शेंडकर - पुणे शहर,तृतीय - पै.करण ढाणे - सोलापुर,तृतीय - पै.अदीनाथ पाटील - कोल्हापुर. ८७ किलो वजन गट:- प्रथम - पै.विनय पुजारी - कोल्हापुर,व्दितीय - पै.विशाल वाळुंज - पुणे जिल्हा,तृतीय - पै.व्यंकटेश बनकर - अंहील्यानगर,तृतीय - पै.जय वेहेले - ठाणे शहर. ९७ किलो वजन गट:- प्रथम - पै.अदीत्य मोहोळ - पुणे शहर,व्दितीय - पै.यज्ञेश शितोळे - सातारा,तृतीय - पै.पृथ्वीराज पडघम - धाराशिव,तृतीय - पै.योगिराज नागरगोजे - लातुर. ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी वजनगट:- प्रथम - पै.दिग्विजय संदिप भोंडवे - पुणे जिल्हा,व्दितीय - पै.अनिल शेळके- बुलढाणा,तृतीय - पै.अनिल गिरमल - कोल्हापुर,तृतीय - पै.ऋषिकेश बोमने - लातूर


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement