• Total Visitor ( 702204 )
News photo

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या 

Raju tapal December 27, 2025 73

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या 

           

शिक्रापूर:- राजगुरूनगर ता.खेड येथील प्राध्यापकाने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २६ डिसेंबरला उघडकीस आली. भानूदास मोतीलाल परदेशी वय -५२ रा‌.मोशी शिवालय अपार्टमेंट इंद्रायणी काॅलनी ता‌.हवेली असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव असून ते गेल्या २२ वर्षांपासून राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवत होते. समजलेल्या माहितीनूसार, प्राध्यापक भानूदास परदेशी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बुधवार दि.२४ डिसेंबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी घेऊन बेपत्ता झाले होते.बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता.दि.२५ डिसेंबरला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खेडच्या पश्चिम भागातील मंदोशी येथील भैरवनाथ मंदिराशेजारी  परदेशी यांची हिरो होंडा वाईन गाडी,काळी बॅग तसेच मंदीराशेजारी असलेल्या विहीरीच्या कडेला चपला मिळून आल्या.खेड पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर रात्री दोन वाजता विहीरीत प्राध्यापक परदेशी यांचा मृतदेह मिळून आला.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत चौकशी सुरू असल्याचे समजते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026