• Total Visitor ( 430692 )
News photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चित्रकूट मध्ये साजरी

Raju tapal June 02, 2025 171

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चित्रकूट मध्ये साजरी



शिक्रापूर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांच्या वतीने चित्रकुटमध्ये साजरी करण्यात आली.शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावचे माजी सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांच्या संकल्पनेतून विमानाने काशीयात्रेला  गेलेल्या भाविकांसमवेत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पूज्य गुरुदेव आचार्य प्रवर महामंडलेश्वर धर्मशाळा चित्रकूट मध्य प्रदेश या ठिकाणी साजरी करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन काशीयात्रेतील भाविकांपैकी छायाताई चव्हाण,पद्माताई थोरात,रंजना चव्हाण,वैशाली चव्हाण,मीना चव्हाण,पुष्पा कंक,आशाताई धनवटे,लताबाई चौधरी या महिला भाविकांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो,छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो,जय श्रीराम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून  त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले,एवढचं नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं.प्रसिद्ध हिंदू मंदिरांंचा त्यांनी जीर्णोद्धार केला;महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले.त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या असे शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष,निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच बापूसाहेब काळे यांनी यावेळी सांगितले.

 बबनराव रणदिवे,दिलीप विधाटे,अनिल गुंजाळ,बाळासाहेब चव्हाण,संदीप चव्हाण,दिलीप चव्हाण,हभप ईश्वर महाराज डुबे,नामदेव काळे,दादा पवार,पोपट भागवत,शंकर चव्हाण,बापूसाहेब गावडे,त्र्यंबक चव्हाण,दादाभाऊ काळे हे यावेळी उपस्थित होते.शरद रासकर यांनी सुत्रसंचलन केले. दिलीप चव्हाण यांनी आभार मानले. 



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement