रास -दा़ंडिया, गरबाचे शिरूरमध्ये आयोजन...
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- पाथ फाई्ंडर फाऊंडेशन आणि ओरटेक्स डान्स अॅकॅडमी प्रस्तुत रास- दांडिया, गरबाचे दि.२७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत शिरूर शहरातील सी टी बोरा काॅलेज रोडवरील साई गार्डन मंगल कार्यालय आवारात आयोजन करण्यात आलेले आहे.
मनसे जनहित विधी कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष,पाथफाईंडर फाऊंडेशनचे अध्यक्ष ,अॅड.स्वप्निलभैय्या माळवे यांनी ही माहिती" टिटवाळा न्यूज"ला दिली.
वकील,डाॅक्टर, शासकीय अधिकारी, व्यापारी, व्यावसायिक,शिक्षक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी तसेच पत्रकार, कुटुंब सदस्यांसाठी या रास -दांडिया ,गरबा खेळाचे नवरात्रौत्सवानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे असे अॅड.स्वप्निलभैय्या माळवे यांनी सांगितले.
ज्या नागरिकांना, कुटूंबियांना इच्छा असूनदेखील दांडिया -गरबा खेळता येत नाही,तसेच सार्वजनिक ठिकाणी जावून ते व त्यांचे कुटुंबीय रास -दांडिया गरबाचा आनंद घेवू शकत नाही अशा दांडिया प्रेमींसाठी हा उत्सव आम्ही आयोजित केला असल्याचे अॅड.माळवे यांनी सांगितले.
उत्कृष्ट गरबा दांडिया खेळणारांना भरघोस बक्षीस, प्रशस्तीपत्र प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात येणार असल्याचे अॅड.माळवे यांनी सांगितले.