• Total Visitor ( 553331 )
News photo

काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती

Raju tapal November 27, 2025 77

काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती



कल्याण :- काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती केली असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिले आहे. नुकतीच जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष यांनी राजीनामा दिलाब. त्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने जिल्हा कार्याध्यक्ष पदी असलेले राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती केली आहे. याबाबत नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले की आज संविधान दिन आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना अधिकारी दिले आहेत, त्या प्रमाणे आज एका सर्वसामान्य बहुजन समाजातील कार्यकर्त्याला जिल्हा अध्यक्ष पदि नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्ष घराघरात पोहचविणार तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करणार व येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष किंग मेकरची भुमिका बजावणार असे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement