श्रीराम सेवा मंडळा तर्फे रामनवमी उत्सव साजरा
सालाबाद प्रमाणे कल्याण जिल्यातील, श्रीराम सेवा मंडळ कचोरे गाव, कल्याण (पु.) येथे रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
श्रीराम सेवा मंडळ हे २००२ पासून रामनवमी उत्सव साजरे करत आहे यंदाचे या उत्सवाचे २३ वे वर्ष होते या उत्सवात वेदमंत्र वीरगर्जना यांच्या ढोल पथक तालावर लेझीम नृत्य साकारण्यात आले त्याचबरोबर आपली परंपरा आणि आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला.
गावातील स्थानिक बँड पथकाने सादर केलेली राष्ट्रगीते, देशभक्तीपर गीते संगीताने सर्वांना मंत्रमुक्त केले.
या उत्सवात ७ दिवस रामकथाचे आयोजन, रामजप महायज्ञ, श्री सत्यनारायणाची पूजा, भव्य शोभायात्रा आणि इतर धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पत्रीपूल येथून सुरू झालेली ही शोभायात्रा, श्री शंकर मंदिर कचोरे, गवळी मंदिर ते मोहनसृष्टी गृह संकुल येथून पुन्हा श्री शंकर मंदिर कचोरे येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना श्रीराम सेवा मंडळ कचोरे यांच्यातर्फे महाभंडारा आयोजित करण्यात आला होता.
रामनवमीनिमित्त कल्याण जिल्ह्यात ठीक ठिकाणी शोभायात्रा आयोजित करण्यात आले होते परंतु कल्याण जिल्ह्यातील सर्वात पहिले रामनवमीला शोभायात्रा सुरू करणारे हे मंडळ गेल्या २३ वर्षांपासून कल्याण मध्ये आपली संस्कृती आणि धर्मजोपासना करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या मार्गदर्शनातून २००२ मध्ये सुरू झालेली श्रीराम नवमीची शोभायात्रा आज मोठ्या स्वरूपात नावारूपाला येऊ लागली आहे ती हिंदू बांधवांच्या वाढत्या सहभागामुळेच, हजारो हिंदू बांधव या शोभायात्रेत दरवर्षी सहभागी होत आहेत.
नागरिकांनी नोंदविलेला सहभाग आणि त्यांच्या उत्साहाचे मंडळाचे अध्यक्ष अतिश चौधरी आणि प्रमुख मार्गदर्शक, आयोजक राजन चौधरी यांनी कौतुकास्पर आभार मानले.
याच मंडळाच्या प्रेरणेतून, आज कल्याण जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते व सर्व नागरिक अशा कार्यक्रमांत आपला सहभाग नोंदवतात.