टिटवाळ्यात रामायु पंचकर्म आयुर्वेदिक हाँस्पिटल सुरु
टिटवाळा गणपती मंदिर परिसरातील राजाभाऊ पातकर यांच्या जुन्या निवासस्थानी रामायु पंचकर्म हाँस्पिटल व वेलनेस सेंटर डॉ.प्रतिक्षा रवींद्र घोडविंदे यांनी सुरु केले असून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी कायैक्रमाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, बाजार समितीचे संचालक योगेश धुमाळ, जालिंदर पाटील, उपजिल्हा प्रमुख सदाशिव सासे,सुदाम पाटील, तालुका प्रमुख वसंत लोणे, काँग्रेसचे जेष्ठ नेते राजाभाऊ पातकर, अण्णा तरे,संजय शेलार, रवींद्र जाधव, चिंतामण मगर, तसेच रवींद्र घोडविंदे, स्मिता घोडविंदे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
डॉ प्रतिक्षा घोडविंदे यांनी सांगितले की पंचकर्म चिकित्सा, आयुर्वेदिक औषधोपचार, जीवनशैली सल्ला, डिटाँक्स थेरपी,स्त्रीरोग व प्रसूती उपचार, त्वचारोग व संधिवात उपचार, डायबेटीस व स्थूलता नियंत्रण, मानसिक आरोग्य सुधारणा, तसेच नैसर्गिक व शुद्ध औषधोपचार, स्वच्छ व शांत उपचार कक्ष,रोगमुक्त व आरोग्य संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम ईत्यादी सेवा उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक उपचार चांगला असतो. उशीरा फरक पडतो व कायमस्वरूपी त्याचा फायदा रुग्णांना होतो. कोवीड सारख्या आजारावरही आयुर्वेदिक उपचार आहेत असे सांगितले.