• Total Visitor ( 430075 )
News photo

खंडाळे परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या परप्रांतीय टोळीला रांजणगाव पोलीसांकडून अटक

Raju tapal December 12, 2025 49

खंडाळे परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या परप्रांतीय टोळीला रांजणगाव पोलीसांकडून अटक



शिरूर :- खंडाळे ता‌.शिरूर परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या परप्रांतीय टोळीला रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी अटक केली आहे.

सुरेशभाई प्रभुभाई धामेचा‌ वय -५१,जितेंद्रभाई दिनेश डाभी‌ वय -४७,मेहुल सुरेशभाई‌ धामेचा‌ वय -२३,भरतभाई देवजीभाई‌ सोळंकी वय ३२,उत्सव जितेंद्रभाई डाभी वय -१९,भरतभाई जीवराजभाई कोळी वय -३३सर्वंजण रा‌.मोरबी गुजरात अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

खंडाळे परिसरातील मातोश्री हाॅटेल शेजारील एका बंद.कंपनीमध्ये काही जण हातात दांडके,हत्यारे घेवून शिरले असल्याबाबत पोलीसांना फोन आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे,पोलीस हवालदार विलास आ़बेकर,पांडुरंग साबळे,संतोष अडसूळ,उमेश कुतवळ यांनी त्या ठिकाणी जावून चौकशी केली.तेव्हा काहीजण पांढ-या रंगाच्या कारमधून पळून गेल्याचे समजले.पोलीस पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून जात असताना हाॅटेल संग्राम समोर जी जे ३६ एल ५८९१ ही संशयित कार पोलीसांना मिळून आली.पोलीसांनी पाहणी केली असता सहाजण दिसून आले.त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता बंद पडलेल्या कंपनीतील कच्चा माल चोरण्याच्या हेतुने आल्याचे आरोपींनी सा़गितले.पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात पुढील तपास करत आहेत.

           


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement