• Total Visitor ( 429423 )
News photo

शेळी बोकडे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रांजणगाव पोलीसांनी केली अटक

Raju tapal December 29, 2025 38

शेळी बोकडे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रांजणगाव पोलीसांनी केली अटक

         

शिक्रापूर:- शेळी,बोकडे चोरणा-या दोघा चोरट्यांना रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी अटक केली.

गणेश कैलास ब्राम्हणे वय -२१,सुनील अण्णाभाऊ माळी वय -२४ दोघेही रा‌.गव्हाणवाडी ता‌.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे असून आरोपींकडून ५ बोकडे,१ शेळी,गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण १ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात,सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे,अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर,नितीन भोरा‌,संदीप जगदाळे,रामेश्वर वाहेकर यांनी या गुन्ह्याचा तपास करून कामगिरी बजावली . शिरूर तालुक्यातील बाभूळसर खुर्द,करंजावणे,गणेगाव खालसा,कर्डेलवाडी,वाघाळे या परिसरातील शेतक-यांच्या वेळी,बोकडे दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. माणिक रामभाऊ काळे रा‌.बाभूळसर खूर्द ता‌.शिरूर यांनी या घटनेबाबत रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. रांजणगाव एम आय डी सी पोलीस पुढील तपास करत आहेत.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement