• Total Visitor ( 431178 )
News photo

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे 41 सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Raju tapal May 14, 2025 119

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे 41 सरपंच पदाचे आरक्षण जाहीर



अनुसूचित जाती करिता 3 व 

अनुसूचित जमातीसाठी 3 राखीव



टिटवाळा :- ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 2025-2030 साला करिता सरपंच पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर व कल्याण तहसीलदार सचीन शेजाल यांच्या उपस्थित मध्ये अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते.

त्या मध्ये अनुसूचित जाती करिता वासुंद्री,आणे-भिसोळ महिला राखीव व कांबा,

तसेच अनुसूचित जमाती आदिवासी साठी काकडपाडा,जांभूळ-वसत व वाहोली हया ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जमाती साठी सरपंच पद राखीव ठेवण्यात आले ठेवण्यात आले आहेत.

तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये 11 ग्रामपंचायत येत असून त्यातील 5 महिला सरपंच राखीव ठेवण्यात आले आहेत. यात

उशीद,वरप,दहिवली, गोवेली,निंबवली-मोस तर सहा जागा सर्वसाधारण साठी ठेवण्यात आले आहेत. त्या मध्ये चौरे, दहागाव,केळणी,म्हसकळ,रुंदे-आंबिवली, वसत-शेलवली ईत्यादी आहेत,ल.

तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 24 ग्रामपंचायत मध्ये सरपंच 

राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 12 महिला सरपंच पद राखीव ठेवण्यात आले आहेत. नडगाव, आपटी, मांजरली, गेरसे,कोसले,म्हारळ, नांदप,गुरुवली,घोटसई, मामनोली, राये-ओझरली, रायते,वेहळे ईत्यादी महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

तर सर्वसाधारण मध्ये बापसई,फळेगाव, कुंदे,खोणी,पोई,रोहन,सांगोडे,उतणे-चिंचवली,बेहरे-खडवली,मानिवली,पळसोळी,वडवली-शिरढोण ईत्यादी होय.

यावेळी तहसीलदार सचिन शेजाल यांनी सांगितले की सदर आरक्षण हे 2011 च्या जनगणेनुसार लोकसंख्या आधारे काढण्यात आले आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण आसल्याने त्या प्रमाणे मागील  सन 2010/2015/2020/हे आरक्षण बघून आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. हे अंतिम आरक्षण आहे असे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, मंडळ अधिकारी दर्शना भावे सह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement