• Total Visitor ( 430653 )
News photo

टिटवाळ्यातील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा 

Raju tapal June 06, 2025 78

टिटवाळ्यातील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा 

श्री.विठ्ठल रुख्मिणी देवतेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात. 



राजू टपाल. 

टिटवाळा :- वैश्य समाजाचे श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर ट्रस्ट टिटवाळा,सल्लागार मंडळ,वैश्य ज्ञाती युवक मंडळ,वैश्य ज्ञाती महिला मंडळ,वैश्य ज्ञाती समाज बांधव श्री ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळ टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळ्यातील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा ५ जून ते ८ जून दरम्यान आयोजित केला आहे. सदरील सोहळा परम पूज्य स.अलोकनाथजी महाराज अध्यक्ष /मठाधिपती प.पू.श्री. रमणनाथजी महाराज संजीवनी समाधी समाज ट्रस्ट,भोगवती नगर शहापूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला असून श्री.विठ्ठल रुख्मिणी देवतेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात गुरुवारी पार पडला. 

सदर सोहळ्यात शुक्रवारी श्री.गणेश पूजन व इतर धार्मिक कार्यक्रम पुण्यहवाचन,मातृका पूजन,सार्वजनिक नांदी,श्राद्ध,आचार्य कर्म,शांती होम इत्यादी धर्माइक उत्साह होणार आहेत. तर शनिवारी सकाळी अवाहीत देवता पूजन,अग्नी स्थापना,अग्नी पूजन,नवग्रह हवन,स्तपण विधी,श्री.विठ्ठल रुख्मिणी मूर्ती १०८ कलश स्नान पुष्पाधिवास व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर रविवारी प्रासादी अधिवास,श्री.विठ्ठल रुख्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा,मूर्ती अभिषेक पूजन,पूर्णाहुती महाआरती,दुपारी महाप्रसाद तसेच गजानन प्रासादिक भजनी मंडळ,मोस यांचा भजनाचा व गायिका कुमारी अक्षदा मांजरे यांचा कार्यक्रम होईल तरी या नेत्रदीपक सोहळ्यास ग्रामस्थ मंडळ टिटवाळा तसेच सर्व वारकरी संप्रदाय यांनी या नेत्रदीपक सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन वैश्य समाजाचे श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर ट्रस्ट टिटवाळा,सल्लागार मंडळ,वैश्य ज्ञाती युवक मंडळ,वैश्य ज्ञाती महिला मंडळ,वैश्य ज्ञाती समाज बांधव श्री ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळ टिटवाळा यांनी केलेले काहे. 

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement