• Total Visitor ( 642086 )
News photo

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाबाबत आढावा बैठक संपन्न...

Raju Tapal publisher July 23, 2026 25

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाबाबत आढावा बैठक संपन्न...



प्रत्येक अधिकाऱ्याने वैयक्तिक जबाबदारीने काम करण्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांचे  निर्देश!...



कल्याण :-भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियानाच्या अनुषंगाने आज दुपारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ,जिल्हाधिकारी,ठाणे  यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मा. स्थायी समिती सभागृहात बैठक संपन्न झाली. या बैठकीस १३८-कल्याण पश्चिम,१४२-कल्याण पूर्व, १४३-डोंबिवली आणि १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी (ERO),सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO),संबंधित विभागीय अधिकारी तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाचा प्रगती आढावा घेण्यात आला. मतदार पडताळणी,गणना पत्रकांचे वितरण व संकलन,माहितीचे अद्ययावतीकरण,डिजिटल नोंदणी तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी  जिल्हाधिकारी,डॉ श्रीकृष्ण पांचाल यांनी विशेष सखोल पुनरीक्षण अभियान हे भारत निवडणूक आयोगाचे अत्यंत महत्त्वाचे आणि कालबद्ध काम असल्याने प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याने आपल्या वाट्याला आलेल्या कामाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून अत्यंत गांभीर्याने व प्राधान्याने काम करावे,असे स्पष्ट निर्देश दिले. कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता निर्धारित मुदतीत सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्या बाबतही त्यांनी सूचना दिल्या. या बैठकीत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी देखील विशेष सखोल पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी वर्गास दिल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement