• Total Visitor ( 701744 )
News photo

पिस्तूलाचा धाक दाखवून तांबडेमळा येथील पेट्रोल पंपावर दरोडा

Raju tapal October 04, 2025 129

पिस्तूलाचा धाक दाखवून तांबडेमळा येथील पेट्रोल पंपावर दरोडा          



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- पिस्तूलाचा धाक दाखवून आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील ऋषी पेट्रोलपंपावर चौघांनी दरोडा टाकून १ लाख ९० हजार ३७० रूपये चोरून नेले.

चोरीच्या या घटनेबाबत समजलेल्या माहितीनूसार,पेट्रोलपंपावरील आॅफीस मध्ये एक कर्मचारी बसला होता. दुसरा कर्मचारी बाहेर होता. हातात पिस्तूल घेतलेले दोन चोरटे आत आले. दोन चोरटे बाहेर लक्ष ठेवण्यासाठी उभे होते. आत आल्यानंतर चोरट्यांनी आतील कर्मचा-यावर पिस्तूल रोखले. बाहेरील कर्मचा-याला आत नेले. पिस्तूलाचा धाक दाखवून चोरट्यांनी कर्मचा-यांकडे पैशाची मागणी केली. घाबरलेले कर्मचारी हात वर करून उभे राहिले. पैसे काढून द्या नाहीतर तुम्हाला ठार मारू असे म्हणत चोरट्यांनी टेबलच्या ड्राॅवरमधील १ लाख ९० हजार ३७० रूपये चोरी करून नाशिकच्या दिशेने फरार झाले. घटनेची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026