• Total Visitor ( 431120 )
News photo

तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंचपदी रोहिणी तोडकर बिनविरोध 

Raju tapal October 30, 2025 104

तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंचपदी रोहिणी तोडकर बिनविरोध 

        

शिक्रापूर (प्रतिनिधी):-  शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंचपदी रोहिणी सुदर्शन तोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दीपाली ढमढेरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर रोहिणी तोडकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. रोहिणी तोडकर यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणपत मरबळ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी जाहीर केले. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वासराव ढमढेरे,अनिलराव भुजबळ,पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ,घोडगंगा कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटराव भुजबळ,प्रभारी सरपंच जबिन बागवान, संतोष ढमढेरे, रमेश भुजबळ,माजी सरपंच अंकिता भुजबळ, दीपाली ढमढेरे,गोविंदराव ढमढेरे,मीनाक्षी ढमढेरे,कामगार तलाठी दशरथराव रोडे,नवनाथ ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते घनश्याम तोडकर,कोमल शिंदे,मनोज आल्हाट,किर्ती गायकवाड,स्वाती लांडे यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रोहिणी तोडकर यांची सरपंचपदावर निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत कार्यालयापासून संत सावता महाराज मंगल कार्यालयापर्यंत फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. युवा कार्यकर्ते,महिला मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement