साहित्यिक सोपान खुडे यांच्याकडून सचिन बेंडभर यांचा सत्कार
कोल्हापूरच्या बालसाहित्य पुरस्काराची विशेष दखल
शिक्रापूर:- महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सोपान खुडे यांनी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांजकडून सचिन बेंडभर यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना घरी आमंत्रित करून शाल व पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला. सचिन बेंडभर यांच्या समग्र मराठी साहित्यकृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास या पुस्तकाला बालसंकीर्ण विभागात न्यू हायस्कूल नेवापुर व मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट साहित्य पुरस्कार ३१ व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष व शाहूवाडी येथील गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. विश्वास सुतार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराची दखल घेत ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी मोशी येथील आपल्या राहत्या घरी सचिन बेंडभर यांचा सत्कार केला. कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे २०२५ या वर्षाचे साहित्य पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. यात बालसंकीर्ण विभागात सचिन बेंडभर यांच्या समग्र मराठी साहित्यकृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास या समीक्षणात्मक ग्रंथाला उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या गोष्टीची दखल घेत साहित्यिक सोपान खुडे यांनी सत्कार केला असल्याचे यावेळी सांगितले. तसेच बेंडभर यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.