• Total Visitor ( 569476 )
News photo

सचिन बेंडभर यांची बचत कथा चौथीच्या पाठ्यपुस्तकात

Raju Tapal publisher June 05, 2026 33

सचिन बेंडभर यांची बचत कथा चौथीच्या पाठ्यपुस्तकात

          

शिरूर:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या पाठ्यपुस्तकात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या बचत कथेचा समावेश करण्यात आला असून हा अभ्यासक्रम येत्या जून पासून सुरू होत आहे. नवीन वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी चौथीच्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कौशल्याधिष्टीत शिक्षणावर यात अधिक भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या बचत कथेचा समावेश चौथीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. येत्या जून पासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेंडभर यांच्या साहित्यकृतींची अभ्यासक्रम मंडळाने याआधी देखील दखल घेत त्यांच्या' कळो निसर्ग  मानवा' या कवितेची निवड सहावीच्या सुगमभारती पुस्तकात, 'येते जगाया उभारी' व "आजोळ" या कवितांचा मंथन प्रकाशनाने शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिकेत समावेश केला आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए. च्या अभ्यासक्रमात "मामाच्या मळ्यात" हा बाल काव्यसंग्रह समाविष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेत विविध उपक्रमाद्वारे बालसाहित्यिक घडवत २० वर्षात त्यांनी मुलांची तीन पुस्तके संपादित केली आहेत. वृत्तपत्रे, मासिक व दिवाळी अंकात कथा व कवितांचे लेखन करीत सचिन बेंडभर यांनी आजपर्यंत आपल्या वयापेक्षाही जास्त एकूण ५८ पुस्तके प्रकाशित केली असून त्यात बालसाहित्य,कथासंग्रह,कवितासंग्रह,कादंबरी आणि अनुवादासह त्यांनी विविधांगी लेखन केले आहे.

     


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement