• Total Visitor ( 702055 )
News photo

जेष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे निधन 

Raju tapal December 08, 2025 149

जेष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे निधन 

         

जेष्ठ पत्रकार तानाजीराव काळे, तसेच जेष्ठ पत्रकार विजयराव ढमढेरे यांची पत्रकार कै.सुरेशराव जकाते‌ यांना श्रद्धांजली 

     

शिरूर:- पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष,इंदापूर शहरातील जेष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे  वयाच्या ५६. व्या वर्षी ५ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वयाच्या १५ व्या वर्षी सुरेश जकाते‌ यांनी त्यांचे वडील कै.अनंतराव शामराव जकाते‌ यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेला सुरुवात केली. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी विविध वर्तमानपत्रातून पत्रकारिता केली. वृत्तपत्रविक्री तसेच पत्रकारिता क्षेत्रात सातत्य ठेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. इंदापूर तालुका सचिव,शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहात होते. त्यांनी विविध वर्तमानपत्रांचे वार्ताहर,बातमीदार म्हणूनही काम केले. ते कट्टर हिंदुत्ववादी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते.प्रवाहाविरूद्ध लिहिणारे पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या साधेपणामुळे , कामातील निष्ठेमुळे, बातमी संकलनातील अचुकतेमुळे ते सहका-यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली,एक मुलगा,जावई,नात,भाऊ भावजय,पुतणे,पुतणी असा परिवार आहे.दैनिक "लोकसत्ता" वृत्तपत्राचे इंदापूर तालुका प्रतिनिधी, पळसदेव (ता‌.इंदापूर ) येथील जेष्ठ पत्रकार श्री.तानाजीराव काळे तसेच पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य,टिटवाळा न्यूज चे प्रतिनिधी,जेष्ठ पत्रकार विजयराव ढमढेरे यांनी पत्रकार कै.सुरेशराव जकाते‌ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026