• Total Visitor ( 430633 )
News photo

शिक्रापूर येथील शंकरराव गायकवाड यांचे निधन 

Raju tapal June 02, 2025 93

शिक्रापूर येथील शंकरराव गायकवाड यांचे निधन 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील जुन्या पिढीतील, धार्मिक क्षेत्रातील शंकरराव कृष्णाजी गायकवाड यांचे शनिवारी सकाळी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वेळ नदीकाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक,उद्योग, वैद्यकीय, क्रिडा, व्यापार तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर अंत्यसंस्कारास उपस्थित होते.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, बालनाट्य परिषदेचे शिरूर तालुका सदस्य राजाराम गायकवाड तसेच पोपटराव गायकवाड यांचे ते वडील होते. दरम्यान,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक, टिटवाळा न्यूज चे प्रतिनिधी, पत्रकार विजयराव ढमढेरे यांनी पत्रकार राजाराम गायकवाड यांच्या राहात्या घरी जावून धार्मिक क्षेत्रातील शंकरराव गायकवाड यांच्या निधनानिमित्त पत्रकार राजाराम गायकवाड यांचे तसेच त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

    


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement