गणेशोत्सव पूर्वतयारी अनुषंगाने शिक्रापूर पोलीसांच्या वतीने बैठकीचे आयोजन
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- गणेशोत्सव पूर्वतयारी अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे रोडवरील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयामध्ये आज मंगळवार दि.१९/०८/२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायत अधिका-यांना पत्राद्वारे कळविले आहे.
ग्रामपंचायत अधिका-यांना कळविलेल्या पत्रात असे म्हटले आहे, सालाबादप्रमाणे या वर्षीही गणेशोत्सव दि.२७/०८/२०२५ ते ६/०९/२०२५ या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
गणेशोत्सव सन २०२५ पूर्वतयारीचे अनुषंगाने मंगळवार दि.१९/०८/२०२५ रोजी ५ वाजता मौजे शिक्रापूर मधील शिक्रापूर -तळेगाव ढमढेरे त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिका-यांची बैठक माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर उपविभाग शिरूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली असून सदर बैठकीस आपण वेळेत हजर राहावे असे पत्रात म्हटले आहे.