• Total Visitor ( 481849 )
News photo

युवकाचा खून करणा-या आरोपींना शिरूर पोलीसांनी केली अटक

Raju tapal October 11, 2025 78

युवकाचा खून करणा-या आरोपींना शिरूर पोलीसांनी केली अटक 

      

शिक्रापूर (प्रतिनिधी) :- जुन्या वैमनस्यातून दगडाने ठेचून युवकाचा खून केल्याप्रकरणी शिरूर पोलीसांचे डी बी पथक, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी तिघा आरोपींना जेरबंद केले. सचिन विलास मांमडवाड,यश ऊर्फ श्रेयस महेश मांदीलकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून आरोपींमध्ये एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. ८ आॅक्टोबरला दुपारी एक ते पावणेसहा या वेळेत शिरूर बायपास पुलाजवळील जमिनीलगतच्या वाॅल कंपाऊंड परिसरात खूनाची ही घटना घडली होती. संतोष मारूती ढोबळे वय -२० रा.वाडा काॅलनी, शिरूर याला त्यांचे परिचित सचिन विलास मांमडवाड ,यश ऊर्फ श्रेयस महेश मांदीलकर व त्यांच्या साथीदाराने बोलावून घेतले होते.त्यांनी ढोबळे याच्या डोक्यात आणि चेह-यावर दगडाने मारहाण केली.या मारहाणीमध्ये संतोष ढोबळे याचा जागीच मृत्यू झाला. डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण ,सागर शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके,राजू मोमीन,संजू जाधव, आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार केली.आरोपी साईनगर येथे लपून बसल्याची माहिती तांत्रिक विश्लेषण,सी सी टी व्ही फुटेज,गुप्त बातमीदारा द्वारे मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले‌.जुना वाद डोक्यात ठेवून खून केल्याची आरोपींनी कबुली दिली.आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता १५ आॅक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. विधीसंघर्षित बालकास बाल न्यायमंडळ येरवडा येथे नेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक राहूल भागवत पुढील तपास करत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement