• Total Visitor ( 481737 )
News photo

घरफोडी करणारा चोरटा शिरूर पोलीसांनी केला जेरबंद

Raju tapal December 04, 2025 71

घरफोडी करणारा चोरटा शिरूर पोलीसांनी केला जेरबंद



शिरूर:- घरफोडी करणा-या चोरट्यास शिरूर पोलीसांनी जेरबंद केले आहे. प्रकाश विलास गायकवाड रा.रामलिंगरोड शिरूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून सुमारे १ लाख १४ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी आरोपीकडून जप्त केला. २० नोव्हेंबर २०२५ रोजी रामलिंग,हत्तीरोड जाधव मळा शिरूर ग्रामीण येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील लाॅकर फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ६० हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण,नितेश थोरात,सचिन भोईर,विजय शिंदे, निखिल रावडे,अंबादास थोरे,निरज पिसाळ,अजय पाटील या पोलीसांच्या पथकाने ही कामगिरी केली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement