• Total Visitor ( 84965 )

शिरूर येथील सिध्दीचा पहाड परिसरात नवरात्रीनिमित्त ऍक्टिव्ह सोशल ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

Raju tapal October 16, 2021 53

शिरूर येथील सिध्दीचा पहाड परिसरात नवरात्रीनिमित्त ऍक्टिव्ह सोशल ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

      

नवरात्रीनिमित्तच्या भोंडला व महासती संयमलताजी यांच्या ३४ व्या दीक्षादिनानिमित्त शिरूर येथील सिद्धीचा पहाड परिसरात चिंच ,वड, अशा ३४ देशी वृक्षांचे रोपण ऍक्टिव्ह सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाची बाब म्हणून नवरात्रीनिमित्त व महासतीची संयमलताजी यांच्या ३४ व्या दीक्षादिनानिमित्त सिद्धीचा पहाड परिसरात चिंच, वड यासारखी देशी झाडे लावण्यात आली. सिद्धेश्वर वनीकरण समितीच्या माव्यमातून वृक्षलागवड व संवर्धन याचे मोठे काम उभे राहिले आहे असे ऍक्टिव्ह ग्रुपच्या प्रमुख कामिनी बाफना यांनी यावेळी सांगितले.

सुनिता बिहाणी, मनिषा नहार, अपर्णा शहा,निलम बोथरा , तुषार वेताळ, रमेश देशमुख, डॉ.सुरेंद्र ढमढेरे, प्रा.सतिश धुमाळ, बाळासाहेब थिटे, जयवंत साळुंके, राज वारके यावेळी उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement